लॉकडाऊन काळात जिवनावश्यक वस्तूंच्या चढ्या दरावर अंकुश कोण ठेवणार..

माथेरान : दिनेश सुतार

कोरोना महामारीचे दिवसेंदिवस रौद्र रूप धारण होत असताना पर्यटनावर अवलंबून असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध माथेरानमधील सर्वसामान्य जनतेची आर्थिकदृष्टया मोठ्या प्रमाणात परवड होत आहे.कसा बसा आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.मात्र महाभयंकर संकट काळात देखील येथील काही कीराणा दुकानदार,भाजी विक्रेते, बेकरी उत्पादक ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.याप्रकारामुळे सर्वसामान्य माणसाची वारंवार गळ चेपी होत असताना स्थानिक प्रशासनकर्ते विशेष करून माथेरान अधिक्षक कार्यालय आपली जबाबदारी झटकून सदर प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माथेरानकर देखील भरडला गेला आहे. अधिक्षक कार्यालयाकडुन या कठीण काळात कोणतीही संवेदनशीलता दाखवली गेली नाही याची खंत येथील लोकप्रतिनिधी देखील व्यक्त करत आहे.वरील सर्व प्रकाराला आवर घालण्यासाठी कोरोना काळात माथेरानकरांना अत्यावश्यक सेवा देणार्या प्रत्येक दुकानादाराला आपल्या मालाचे दर पत्रक लावून व्यवसाय करण्याचे आदेश अधिक्षकांनी दिल्यास ग्राहकांना मुबलक दरात जिवनावश्यक वस्तू मिळाल्या तर अर्थीक मंदीच्या काळात सर्व सामान्य माणसाच्या खिशाला चाट बसणार नाही.यासाठी प्रत्येक दुकानात दर पत्रक लागलेच पाहिजे या मागणीसाठी माथेरानकर आग्रही आहेत.

————————————————————

कोरोना काळात पर्यटन अभावी येथील सर्वसामान्य नागरिक अर्थीकदृष्ट्या हतबल झाले आहेत.आशा परीस्थितीत अत्यावश्यक सेवा देणार्या काही विक्रेत्यांनी लॉकडाऊनचा गैरफायदा भाजी,कीराणा,अंडी,दुध याचे भाव चढ्या दराने घेत होते.यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागली जात आहे.यासाठी वाजवी दरात जिवनावश्यक वस्तु विक्री करण्याकरीता येथील स्थानिक प्रशासनाने अंकुश ठेवणे आवश्यक आहे.

—————————–

योगेश जाधव (नागरिक)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत