क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आजपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र पावसाचा अडथळा असल्याने नाणेफेकीला आणि सामना सुरू होण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.
या मैदानावर इतिहास भारताच्या बाजूने नसला तरी भारतीय संघ यंदा इतिहास बदलण्यासाठी उत्सुक आहे. भारताने या मैदानावर १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्या सामन्यांपैकी भारताने अवघ्या दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यापैकी एक विजय १९८६ मध्ये तर दुसरा विजय २०१४ मध्ये मिळवलेला आहे. याशिवाय भारताला ११ लढती गमवाव्या आहेत, तर चार सामने बरोबरीत सुटले आहेत.
शेयर करा