लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांचे भावनिक ट्विट

मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मुंडे यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट करत मुंडे यांना अभिवादन केले आहे. आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्याच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले आहे.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1204924025253830656

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, भाजपच्या नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी आपण आपली भूमिका जाहीर करू असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केल्यानंतर सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षात पंकजा मुंडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असताना आपण गोपीनाथ मुंडे याचाच वारसा चालवत असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपण गोपीनाथ मुंडे यांचे सच्चे वारसदार असल्याचे सूचित केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत