लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 11062 पवन एक्स्प्रेसचे इंजिन रेल्वे रुळावरुन घसरले

घसरलेले रेल्वे इंजिन स्टॉपरवर धडकले

pawan express engine Lokmanya Tilak Terminus platform | घसरलेले रेल्वे इंजिन स्टॉपरवर धडकले

मुंबई : रायगड माझा वृत्त

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 11062 पवन एक्स्प्रेसचे इंजिन रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. टर्मिनस येथील फलाटावर प्रवेश करत असताना इंजिन स्टॉपरवर जाऊन आदळले. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

सद्यस्थितीत इंजिन हटविण्याचे काम सुरू असून घटनास्थळी रिलीफ इंजिन दाखल झाले आहे. या घटनेमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या आणि एलटीटीकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत