लोकलमधली महिला चोर गजाआड

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

टापटीप पेहराव करून लोकलमध्ये महिलांची पर्स चोरणारी एक महिला दादर रेल्वे पोलिसांच्या हाती लागली आहे. तिला रंगेहाथ चोरी करताना पकडल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून तब्बल दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.अनिता पवार ऊर्फ मथुरा चव्हाण (40) असे त्या हटके चोर महिलेचे नाव आहे.

दादर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 व 2 वर उपनिरीक्षक ज्योती चव्हाण व ‘निर्भय’ पथकाच्या ज्योत्स्ना दळवी, मनीषा अलझेंडे, मंगला गावीत यांना 16 तारखेच्या दुपारी अनिता ही एका महिलेची पर्स चोरताना रंगेहाथ सापडली. त्यावेळी अनिताच्या अंगावर दीड लाखाचे सोन्याचे दागिने होते. त्यामुळे तिला ताब्यात घेऊन शशिकांत लोंढे व त्यांच्या पथकाने कसून चौकशी केली असता तिने दादर रेल्वे स्थानकात केलेल्या दोन गुह्यांची कबुली दिली. त्यानंतर तिच्या ऐरोली येथील घरात पोलिसांना साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने सापडले. अनिता ही रेकॉर्डवरची चोर आहे. कोणालाही आपला संशय येऊ नये म्हणून ती चांगली साडी नेसते, सोन्याचे दागिने घालते. याचाच फायदा घेत ती लोकलमध्ये गर्दीच्या वेळी पर्स चोरते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत