लोकलमधील प्रवाश्यांचे मोबाइल चोरणारे जेरबंद, १८ मोबाइल केले हस्तगत

ठाणे : रायगड माझा वृत्त

मोबाइल चोरी करणाऱ्या सराईत दुकलीला मुंब्रा पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून विविध कंपनीचे एकूण 18 मोबाइल  हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेल्या मोबाइलची किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे. मोहम्मद शेख उर्फ चावला (वय २१) आणि परवेज कुरेशी (वय – २१)  अशी अटक केलेल्या दुकलीची नावे आहेत. हे दोघेही मुंब्य्रातील राहणारे आहेत. खासकरून हे दोघे कुर्ला ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधील प्रवाश्यांचे मोबाइल चोऱ्या करीत असत. त्यांच्याकडून ठाणे शहर आणि मुंबई हद्दीतील आणि कुर्ला ते मुंब्रा लोकल प्रवासातील १८ मोबाइल हस्तगत केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.

Mobile thieves arrested who robbed mobile in the local area, 18 mobiles are seized | लोकलमध्ये मोबाइल चोरणारे जेरबंद, १८ मोबाइल केले हस्तगत 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत