लोकल मार्ग हिटलिस्टवर?

मुंबई : रायगड माझा 

दहशतवादी संघटनांकडून मुंबईतील लोकल मार्ग उडवून देण्याचा अॅलर्ट आल्याने पश्चिम रेल्वेचा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाकडून रेल्वे रूळ उडवून देण्याचा कट शिजत असल्याचा संदेश बुधवारी फिरला. वरिष्ठ पातळीवर आलेल्या या ईमेलनंतर तातडीने योग्य उपाययोजना हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात बुधवारी याबाबतचा ईमेल येताच, वरिष्ठ पातळीवर धावपळ सुरू झाली. त्याकडे गांभीर्याने पाहत धोक्याचा संदेश कोणत्या संघटनांकडून आला का, याचाही तपास केला जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत