लोकसंघर्ष मोर्चा आझाद मैदानात दाखल

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

शेतकरी आणि आदिवासींचा लोकसंघर्ष मोर्चा सोमय्या मैदानातून आझाद मैदानात दाखल झाला आहे. वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्‍यात आला आहे. ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्यातील आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या उलगुलान मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत सरकारने चर्चा करण्यासाठी आज दुपारी १.३० ची वेळ दिलेली आहे. मात्र या चर्चेत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत व निर्णय झाले नाही तर प्रत्येक शेतकर्‍याने दोन किलो तांदूळ आणि एक किलो डाळ अशी शिधा सोबत आणलेली आहे. चार वेळेस जेवणाला पुरेल इतकी शिधा शेतकऱ्यांकडे आहे. ही शिधा संपल्यावर हजारो शेतकरी आझाद मैदानातील ठिय्या सोडून मंत्रालयावर कूच करेल आणि आपल्या मागण्या मान्य करून घेईल, असा इशारा लोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव व उलगुलान मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत