लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घ्याव्यात

उत्तरप्रदेश सरकारने नेमलेल्या समितीचा प्रस्ताव 

लखनौ : रायगड माझा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घ्याव्यात, असा प्रस्ताव उत्तरप्रदेश सरकारने नेमलेल्या समितीने दिला आहे. त्यामुळे एकत्रित निवडणुकांशी संबंधित वन नेशन, वन इलेक्‍शन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली संकल्पना उचलून धरणारे उत्तरप्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे.

एकत्रित निवडणुका घेण्यासंदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्या राज्याचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीने आज आपला अनुकूल अहवाल योगींकडे सादर केला. आता तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. समितीने 1967 पर्यंत लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी होत होत्या याकडे लक्ष वेधले आहे.

मतदारयाद्यांमधील चुका टाळण्यासाठी मतदारांच्या नावांशी आधार क्रमांक जोडले जावेत, असे या समितीने सुचवले आहे. वन नेशन, वन इलेक्‍शन ही संकल्पना मोदींनी मांडल्यानंतर त्यावर विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. विधी आयोगाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सातत्याने आणि एकापाठोपाठ होणाऱ्या निवडणुकांमुळे खर्च वाढतो. तसेच, आचारसंहितेमुळे विकासकामांत अडथळा येतो, हे मुद्दे पुढे करून एकत्रित निवडणुकांची संकल्पना मांडण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत