लोकसभेच्या रणांगणातून सुनील तटकरेंची माघार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदार संघातून माघार घेतल्याने, रायगडमधून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचं नाव निश्चित होण्याची चिन्हं आहेत.

तर मावळमध्ये भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे आणि पार्थ पवार यांची नावे चर्चेत आल्याने आजच्या आढावा बैठकीत या दोन्ही मतदारसंघातील सस्पेंस कायम राहिलाय. भास्कर जाधव यांनी बैठकीत रायगडमधून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यावर सुनील तटकरे यांनी तात्काळ मी निवडणूक लढवण्यास इच्छूक नाही. भास्कर जाधव यांची इच्छा असेल, तर त्यांना संधी द्यावी आम्ही काम करू असं स्पष्ट केलं.

महत्त्वाचं म्हणजे रायगडमधून भास्कर जाधव यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर जिल्हा पातळीवरुन माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव आलं होतं.

तर दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब भोईर आणि संजोग वाघेरे या दोघांनी मावळ लोकसभा निवडणूक लढण्याची आपली इच्छा व्यक्त केली . त्यामुळे या दोन्ही मतदार संघातून अनपेक्षितपणे इच्छुकांची नावे पुढे आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत