लोकांनी लॉकडाऊनची मानसिकता ठेवा!; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

Maharashtra Health Minister Rajesh Tope on Lockdown Mumbai Local sgy 87 |  लॉकडाउनसंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले… | Loksatta

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत केले होते. दरम्यान, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिले आहेत. तसेच, जनतेने लॉकडाऊनची मानसिकता ठेवा असा गंभीर इशाराही दिला आहे.

आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते असं देखील म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगितल्या. लोकांचे मनोबल आणि उत्साह वाढवण्यासाठी केलं असेल त्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही. पण सध्या लसीकरणावर फोकस करणे जास्त गरजेचे आहे”. लॉकडाऊन बाबत टोपे म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत लोकांना आधी कल्पना देऊनच हा निर्णय घेतला जाईल. मात्र, लोकांनी मानसिकता ठेवायला हवी. या सगळ्याची पूर्वसूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील. त्यामुळे मानसिकता ठेवा असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी जनतेला दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत