लोणावळ्याजवळ 2 कारचा भीषण अपघात, 7 ठार, दोन गंभीर; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

पुणे :रायगड माझा 

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एका भीषण अपघात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा तर सहा पुरुषांचा समावेश आहेत. दोन जण गंभीर जखमी असल्तयाची माहिती मिळाली आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कार्ला फाट्या जवळ हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅन्ट्रो आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर धडकून झालेल्या या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कार मुंबईच्या दिशेने जात होती, तर सॅन्ट्रो पुण्याच्या दिशेने. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर जाऊन सेन्ट्रो गाडीला समोरून जोरदार धडकली. या भीषण अपघातात सॅन्ट्रो मधील दोन तर स्विफ्ट मधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट मध्ये लहान मूल असल्याची माहिती मिळत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत