लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठ ते मांगरूळ-खडकोली-वाघोसे या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था

रायगड माझा वृत्त | माणगाव 

 

रायगड जिल्ह्यातील लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठ ते मांगरूळ-खडकोली-वाघोसे या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींकडून मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप आहे. मुंबई-गोवा महामार्गाची सुद्धा दुरावस्थाझालेली आहे. परंतु गावा-गावाल्या जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था देखील काही चांगली नाही. त्यापैकीच एक म्हणजे लोणेरे विद्यापीठ ते मांगरूळ-वाघोसे-खडकोली कडे जाणारा रस्ता. या रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून रोज प्रवास करून नागरिकांना कंबरदुखीचा आजार होत असल्याचे बोलले जात आहे. .वृद्ध व्यक्तींना तर याचा नाहक त्रास होत आहे.गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला परंतु या गावांकडे जाणारा रस्ता मात्र झाला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आश्वासने मिळून देखील रस्ता मात्र जैसे थेच आहे. आपण निवडून दिलेल्या या लोकप्रतिनिधींनीकडून जर रस्त्यांसारखी साधी काम होणार नसतील तर मग अशा लोकप्रतिनिधींचा उपयोग काय ? असा सवाल सर्व सामान्य नागरिकांन कडून विचारला जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत