लोहगाव येथील लॉजवर छापा; चार मुलींची सुटका

पुणे: रायगड माझा

लोहगाव येथील लॉजवर छापा टाकून चार मुलींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी लॉज चालकास अटक करण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना पोलीस नाईक सचिन कदम यांनी लोहगाव येथील तोरणा लॉजवर दिपक नावाचा व्यक्ती मुलींकडून वेश्‍या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने विमानतळ पोलिसांची मदत घेऊन लॉजवर छापा टाकला.

यामध्ये पश्‍चिम बंगाल राज्यातील दोन व महाराष्ट्रातील दोन सज्ञान मुलींची सुटका करण्यात आली. त्यांना वेश्‍याव्यवसायाला लावणारे दीपक उर्फ गोविंद प्रसाद (27, रा. मध्यप्रदेश), दगडु सुदाम खांदवे (रा. लोहगाव) लॉज मॅनेजर मनोज प्रभुदयाल दोहरे (रा. मध्यप्रदेश) व भीमराव महेंद्र दोहरे (20, रा. मध्यप्रदेश) यांच्याविरुध्द अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानूसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईवेळी मनोज दोहरे व भीमराव दोहरे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख 35 हजार, सात मोबाईल, हिशोबाच्या डायऱ्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पीडित मुलींना महंमदवाडी येथील रेस्क्‍यु होममध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सचिन कदम, राजाराम घोगरे, नामदेव शेलार, तुषार आल्हाट, प्रदिप शेलार, नितीन तेलंगे, संदीप गायकवाड, रेवनसिध्द नरोटे, सुनील नाईक, गीतांजली जाधव, अनुराधा ठोंबरे, सुप्रिया शेवळे व विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास सोडे यांच्या पथकाने केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत