बाळंतपणासाठी आलेल्या महिलेस एडस सांगून प्रसूती करण्यास दिला नकार, पाली प्राथमिक आरोग्य अधिकारी यांचा धक्कादायक प्रकार 

( विनोद भोईर – पाली )
आदिवासी गरोदर महिलेस प्रथिमीकअरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिका-यांनी एच.आय.व्ही.असल्याचे सांगून या महीलेस सेवा नाकारून आलिबाग येथील शासकीय दवाखान्यात जाण्याचा सल्ला देऊन या महिलेच्या व पतीच्या मनावर निष्कारण मानसिक तणाव आणला.सदर महिलेने बाळंतपण तातडीचे असल्याने १६ जानेवारी रोजी  रात्री ८ च्या दरम्यान खाजगी दवाखान्यात दाखल  केली.व तेथील डॉक्टरांनी  बाळंतपणासाठी आवश्यकअसणाऱ्या सर्व चाचण्या पार पाडल्यात यामध्ये एच आय व्ही ची चाचणी निगेटिव्ह आली व सदर महिलेचे बाळंतपण केले  तीला  मुलगा झाला व दोघ्रही  सुखरूप असल्याने  कुटुंबाचा  मानसिक तणाव दूर झाला.परंतु  प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रमेश भगत यांनी चुकीचा सल्ला देऊन निष्काळजी पणामुळे आदिवासी महिलेला नाहक मानसिक त्रास दिला. या हलगर्जी पणाचा सुधागड तालुक्यातून संताप व्यक्त होत असून .सदर  वैद्यकीय अधिका-यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

एच.आय.व्ही.नसल्याचे निष्पन्न  होऊन सुखरुप बाळंतीन झाल्याने अदिवासी समाजात संताप व्यक्त केला जात आहे . या  प्राथमिक आरोग्य केंद्रावरून  सामान्य जनतेचा विश्वास उडाला आहे . याबबत सविस्तर वृत्त असे कि  सुधागड तालुक्यातील पेडली  येथील आदिवासी गरोदर महिला आपल्या माहेरी पहिल्या बाळंत पणासाठी नाडसूर तालुका सुधागड येथे आपल्या आई वडीलांकडे आली होती.प्रसुतीची वेळ जवळ आल्याने मंगळवार दि.१६ जानेवारी  रोजी संध्याकाळी ७ वाजनेच्या सुमारास  तिला पाली प्राथमिक अरोग्य केंद्रात तिच्या नातेवाईकांनी आणली असता.प्राथमिक तपासणीत येथील  वैद्यकिय अधिकारी डॉक्टर रमेश भगत यांनी गरोदर महिलेस एच.आय.व्ही.आसल्याचे सांगितले व येथे बाळपण होणार नाही तिला अलिबाग येथे घेऊन जा असा सल्ला दिला.परंतु बाळंतपणाची वेळ जवळ आल्याने तिला पाली येथीलच खाजगी दवाखान्यात दाखल  करुन तिच्या पुन्हा एकदा तपासण्या करुन एच आय.व्ही.नसल्याचे खात्री करुन तिचे  सुखरुप बाळंपण करण्यात आले.
गरोदर महिला आणि तिच्या पतिसह नातेवाईकांना समोरा समोर एच.आय.व्ही .अशा गंभीर आजार बद्दल कोणतीही खातरजमा न करताच वैद्यकीये अधिका-यांनी सांगणे हे योग्य आहे का? असा सवाल करुन गरोदर महीलेचे बाळंपण होणार होते.काही काळातच तिची प्रसुती झाली सुध्दा या प्रसुती दरम्यान  या गरोदर महिलेचा रक्तदाब अथवा ह्दय विकाराचा झटका येवून काही बरे वाईट झाले असते .तर यास जबाबदार कोण? असा प्रश्न चर्चा येत आहे. सुधागड तालुका हा बहुतांशी अदिवासींचे वास्तव्य असलेला आणि डोंगर द-याखो-यात वसलेला तालुका आहे.खाजगी उपचार करून घेणे येथील जनतेस न परवडणारी बाब आसतानाही शासनाच्या उदासीन  धोरणामुळे आणि आसल्या अर्धवट  व वैद्यकीये अधिका-यांमुळे खाजगी दवाखान्यात जाण्या शिवाय पर्याय नाही.या वैद्यकीये अधिकारी रमेश भगत यांचे बद्दल तालुक्यात असंख्य  तक्ररारी झाली असून आदिवासी त्यांना गलीच्छ वाटतात त्यामुळे आदिवासींची बाळंपण साधीअसतानाही त्यांचा अर्थिक परिस्थितीचा  विचार न करता  आलिबाग येथे जाण्याची सल्ला देतात .दि.१८ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत वरील विषया संदर्भात चर्चा होऊन वैद्यकीये अधिकारी रमेश भगत याचा वर कारवाई करण्यात यावी असा एकमुखी ठराव  करणेत आले.
 या गंभीर घटनेबाबत पाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ रमेश भगत यांच्या कडे विचारणा केली असता ते म्हनाले की  सदर  गरोदर महिलेची मी प्राथमिक तपासणी केली असता तिला एच आय.व्ही .असल्याचे चाचणीतून निष्पन्न  झाले आहे व त्या  मतावर मी ठाम आहे असे सागितले
मंगळवार दि.१६ जानेवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास आमच्या दवाखान्यात प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेचे रीपोट तपासले असता पाली प्रथमिक आरोग्य केद्रातील डॉक्टरानी सदर महिलेस एच आय व्ही असल्याने तीला अलिबाग येथे जाण्याचा सल्ला दिला होता . परंतु तीची पुन्हा आम्ही  एच आय व्ही तपासणी केली असता एच आय व्ही नसल्याचे निष्पन्न झाले व तीची प्रसूती करून बाळ बाळंतीण  सुखरूप आहेत.
:   उमाकांत जाधव,डॉक्टर – पाली
घडलेली बाब अति गंभीर असून वरिष्ठ पातळीवर याची सखोल चौकशी करून डॉक्टर रमेश भगत यांचेवर कारवाई करण्यात यावी अन्यथा  संपुर्ण  सुधागड तालुक्यातील अदिवासी बांधव  आंदोलन छेडतील.
:- वामन वारे सुधागड तालुकाउपाध्यक्ष, आखिल भारतीय अदिवासी विकास परिषद.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत