वजुभाई वाला यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा ठेवत राजीनामा द्यावा : शरद पवार

मुंबई : रायगड माझा 

कुठल्याही राज्याच्या राज्यपालांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. पण कर्नाटकच्या राज्यपालांनी लोकशाहीला आघात देण्याचे काम केले असल्यामुळे ते राजीनामा देतील अशी अपेक्षा शरद पवार शरद पवारांनी व्यक्त केली.

काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार भाजपच्या कोणत्याही आमिषाला बळी पडले नाही. पंतप्रधानांचे ना खाऊंगा, ना खाने दुंगा, हे वाक्य काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी पाळले, त्यांचेही शरद पवारांनी अभिनंदन केले आहे. चिंतेची बाब की बहुमत नसताना राष्ट्रीय नेतृत्वाने येडियुरप्पा यांना सरकार बनवण्याची सूचना दिली आणि राज्यपालांनी पण त्यांचाच सत्ता स्थापनेसाठी बोलवले हे देशाच्या संसदीय लोकशाहीला घातक असल्याचेही शरद पवारांनी म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत