वडवली येथे आमदार चषकाला सुरूवात  नेरळ पो.नि.सोमनाथ जाधव यांच्या हस्ते उद्घाटन 

नेरळ – कांता हाबळे
कर्जत तालुक्यातील वडवली येथे गुरूवार दि. ११ जानेवारी ते १४ जानेवारी रोजी या कालावधीत कर्जत तालुका स्तरीय क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. या सामन्यामध्ये विजेत्या संघाला आमदार चषक देवून सन्मानित करण्यात येणार असून या सामन्यांचे उद्घाटन नेरळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निनिक्षक सोमनाथ जावध यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले.
       श्री गणेश क्रिकेट संघ वडवली आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सागर शेळके यांनी या सामन्यांचे आयोजन केले आहे. श्री गणेश पुजन करून या सामन्यांना सुरूवात करण्यात आली. तीन दिवस हे सामने खेळविले जाणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सागर शेळके शांताराम लोंगले, जिल्हा युवक उपाध्यक्ष विरेंद्र जाधव, किशोर गायकवाड, धोंडू राणे, योगेश कांबरी, रमेश लदगे, रूपेश कोंडे, शहाजी ठाकरे, संभाजी लदगे, डी. शेंडे, तसेच उमरोली विभागातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत