वन प्लस ६ टी चा मॅकलर्न आज भारतात लाँच

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for वन प्लस ६ टी चा मॅकलर्न

वन प्लस ६ टी चा मॅकलर्न आज भारतात लाँच होणार आहे. मंगळवारी या फोनचे जागतिक स्तरावर अनावरण झाले. वन प्लस ६ टीच्या या नवीन फोनमध्ये १० जीबी रॅम आहे. नवीन फोन कंपनीचे नवे फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान Warp Charge 30 वर आधारित आहे. वन प्लस ६ टीमध्ये मागील बाजूस कार्बन फायबर पॅटर्न आहे आणि स्मार्टफोनच्या खालच्या बाजूस मॅकलर्न सिग्नेचर आहे. बॉक्समध्ये मॅकलर्नशी संबंधित इतरही गोष्टी आहेत.

वन प्लस ६ टी मॅकलर्न ची भारतातील संभाव्य किंमत

वन प्लस ६ टी मॅकलर्न ची किंमत ब्रिटनमध्ये ६४९ ग्रेट ब्रिटन पाऊंड (अंदाजे ५८,८०० रुपये) आहे. जी वनप्लस ६ टीच्या ८जीबी/ २५६जीबी स्टोरेज असलेल्या मिडनाइट ब्लॅकपेक्षाही अधिक आहे. याच्या सर्वोच्च मॉडेलची किंमत ४५,९९९ रुपये आहे, म्हणून भारतात वन प्लस ६ टी मॅकलर्नची संभाव्य किंमत ५० हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

वन प्लस ६ टी मॅकलर्न ची वैशिष्ट्ये :

>> रिअर पॅनल वर काचेच्या खाली कार्बन फायबरचा वापर
>> बॉडी रंग काळा आणि खालच्या कोपऱ्यात मॅकलर्न पपई ऑरेंज रंगाची सिग्नेचर
>> Warp Charge 30 सपोर्ट करणारी नारंगी रंगाची केबल
>> ३० वॅटचा जलद चार्ज करणारा चार्जर
>> अपर्चर एफ/१.७ सह १६ मेगापिक्सल प्राइमरी सोनी IMX519 सेन्सर
>> अपर्चर एफ/१.७ सह २० मेगापिक्सल सोनी IMX376K सेकंडरी सेन्सर
>> कॅमेऱ्याने ४के आणि सुपर स्लो मोशन विडियो रिकॉर्डची सुविधा
>> रिअर कॅमेरा OIS और EIS सह ड्युल-एलईडी फ्लॅश
>> सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल सोनी IMX371 सेंन्सर, अपर्चर एफ/२.०
>> फ्रंट कॅमेरा EIS सपोर्ट
>> १०८० पिक्सलची विडियो रिकॉर्डिंग सुविधा

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत