वरदविनायकाचे दर्शन घेत महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराला सुरूवात

खोपोली: समाधान दिसले

दसरा सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने याची सणाची सर्वत्र धामधूम असते. हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’. ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते.

दसरा हा पराक्रमाचा, शुभ दिवस असल्याने अनेक जण या दिवशी नव कार्याची सुरुवात करीत असल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेना – भाजपा- आर.पी.आय – रासपा – शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपल्या प्रचाराची श्री वरदविनायक मंदीर महड येथे गणराला श्रीफळ वाढून दर्शन घेत सुरूवात केली तर शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरुढ पुतळ्यास पुष्पहार घालीत वंदन केल्याने शिवसैनिक-युवासैनिक व मतदार राजांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच खोपोली शहरातील प्रचार कार्यालयाचा उघ्दाटन सोहळा ही संपन्न झाला असून यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बापू घारे यांनी आपले विचार मांडताना कोणीही गाफिल राहू नका तसेच शिवसैनिकांनो तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. भाजपा तुमच्या पुढे एक पाऊल ठेवून काम करेल असे मत मांडले.

याप्रसंगी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे, भाजपा तालुका अध्यक्ष बापू घारे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय पाटील, तालुका प्रमुख संतोष विचारे, उप संजय देशमुख, भाई शिंदे, खोपोली शहर अध्यक्ष सुनिल पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, आरपीआय जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, विभागप्रमुख हुसेन खान, पदमाकर पाटील, रोहिदास पिंगळे, सनी यादव, प्रसाद पाटील, चंद्रकांत फावडे, संदीप पाटील, राजेश पाटील, खोपोली नगरसेवक अमोल जाधव, भाऊ सणस आदी प्रमुखासह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. तर यावेळी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सर्व नागरिकांना दसरा सणाच्या शुभेच्छा दिल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत