वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नीतूने सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले

बुडापेस्ट (हंगेरी) : रायगड माझा ऑनलाईन

Image result for nitu boxing champion

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट सुरु केली आहे. दुसरीकडे बुडापेस्ट (हंगेरी) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नीतूने (४८ किलो) सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षीही गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते.

नीतू हरियाणाची असून तिने आशियाई चॅम्पियनशिपही जिंकली आहे. वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपममध्ये तिचा सामना थायलंडच्या निलाडा मीकून हिच्याशी झाला.

भारताच्या मनीषा(६४ किलो), अनामिका (५१किलो) आणि साक्षी(५७ किलो) यांनीदेखील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मनीषाचा सामना इंग्लंडच्या जेम्मा रिचर्डसनशी होणार आहे तर अनामिकाचा डेस्टिनी गार्सियाशी. साशीची लढत क्रोएशियाच्या निकोलिना सासिच हिच्याशी होणार आहे. भारताच्या महिला संघाने गेल्यावेळी सात पदके जिंकली होती. यावेळीही त्यांची कामगिरी चांगली झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत