वर्षासहलीसाठी गेलेल्या इसमाचा संशयास्पद मृत्यू,  माणगांव तालुक्यातील वर्षासहलीचा पहिला बळी

माणगांव : प्रवीण गोरेगावंकर

माणगांवपासून जवळच एका बंद असणाऱ्या दगडखाणीत वर्षासहलीसाठी गेलेल्या एका 50 वर्षाच्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. वर्षा सहलीसाठी आलेल्या 24 जणांच्या चमुपैकी एक इसम अचानक बेपत्ता होऊन त्याच्या थेट मृत्यूच झाल्याने हा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दगडखाणीजवळ तिलोरे फाट्याजवळील मानस हॉटेलचे 24 कर्मचारी वर्षासहलीसाठी गेले होते. हि सहल हॉटेलमालक व मॅनेजर यांनी आयोजित केली होती. जेवणापूर्वीच 24 जणांपैकी एक इसम गायब झाल्याचे समजले. हि बाब लक्षात येताच त्याची सर्वत्र शोधाशोध केली मात्र हा इसम सापडला नाही त्यानंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईक व गावाकडील घरी चौकशी केली तेथेही तो मिळून आला नाही. हा इसम मिळुन न आल्याने याबाबत माणगांव पोलिस ठाण्यात 10 जुलै रोजी सायंकाळी हरवल्याची तक्रार मानस हॉटेल मॅनेजर शेखर गंगाराम शिर्के (41) रा. इंदापूर यांनी दिली होती. माणगांव पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिल्यानंतर माणगांव पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी स्कुबा टिमला पाचारण करण्यात आले. त्यांनी 11 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता दगडखाणीतील पाण्यात शोध घेतला असता अनिल कलमकर यांचे प्रेत मिळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सदर घटनेचा अधिक तपास पो.नि. विक्रम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलिस करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत