लातूर : रायगड माझा वृत्त
लातूर-मुखेड रस्त्यावर भीषण दुर्घटना घडली आहे. वऱ्हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. शिरुर ताजबंद-मुखेड राज्यमार्गावरील ही घटना आहे. आयशर टेम्पो आणि टँकरची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला. मृत पावलेले वऱ्हाडी हे औसा तालुक्यातील खरोसा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लातूर- मुखेड रस्त्यावर जांब (नांदेड) या ठिकाणी शनिवरी (12 मे) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
शेयर करा