वसंत भोईर यांच्या हाती अखेर भाजपचे कमळ!

रायगड माझा वृत्त ।

राष्ट्रवादी माजी नेते आणि सिडकोचे माजी संचालक वसंत भोईर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत भोईर हे भाजपात दाखल झाले आहेत. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आणि रायगडचे भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासह कर्जत तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादीचे नेते वसंत भोईर यांनी एकत्रित राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. तेंव्हा या दोघांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुरेश टोकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान टोकरे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर एकटे पडलेले वसंत भोईर हे भाजपात जाण्याचा निर्णयावर ठाम होते. त्यावरून आज वसंत भोईर यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे.

आगामी येणाऱ्या कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत भोईर यांनी भाजपात केलेला प्रवेश हा कर्जत आणि खालापूर तालुक्यातील भाजपाला बळ देणारा ठरेल असा विश्वास कर्जतच्या भाजप पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे वसंत भोईर यांच्या भाजप प्रवेशानंतर कर्जत नगरपरिषदेची निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र आता कर्जतकरांना पाहायला मिळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत