वसईतील चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले, हेलीकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरु

पालघर : रायगड माझा वृत्त 

पावसाचा जोर वाढल्यामुळे वसईतील चिंचोटी धबधब्यावर पोहायला गेलेले 40 जण अडकले आहेत. धोकादायक ठिकाणी असलेल्या यापैकी पाच जणांना हेलीकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. तर पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर काही जण बाहेर पडले.

अजूनही 15 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.चिंचोटी धबधब्यावर पायी जाण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे वसईच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली. या सर्वांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात येणार आहे. अडकलेले सर्व जण सुरक्षित आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.