वसईत पोलिसांवर हल्ला, १८ जणांना अटक तर बिल्डरच्या ९ गाड्या ताब्यात

रायगड माझा ऑनलाईन | वसई

पोलिसांवर काल झालेल्या हल्ल्यानंतर आज भोईदापाडा परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणा १८ जणांना अटक केली आहे. तर बिल्डराच्या ९ गाड्या तब्यात घेतल्या आहेत. 

पोलीस फौजफाटा तैनात
दरम्यान, आज अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार नाही. ही कारवाई बंद रहाणार आहे. पुढच्या आठवड्यात ही कारवाई पुन्हा सुरु होईल. आज दिवसभर पोलिसांचा ताफा या भागात तैनात करण्यात आलाय.

कारवाई दरम्यान तुफान दगडफेक
वसईत अनाधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली. वसईच्या राजीवली वाग्रालपाडा परिसरात ही दगडफेक झाली. काल सकाळपासून या परिसरात वसई विरार महापालिकेची अनाधिकृत बांधकामावर तोडक कारावाई सुरू होती. यावेळी शेकडो घरं तोडल्यानंतर स्थानिकांनी अचानक दगडफेक सुरु केली. यावेळी पोलिसांनीही लाठीचार्ज केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत