वांगचुक आणि वाटवाणींना मॅगसेसे जाहीर

 

रायगड माझा 

आशियातील नोबल पुरस्कार समजला जाणारा रेमन मॅग्सेस पुरस्कार यंदा दोन भारतीयांना जाहीर झाला आहे. ‘थ्री इडियट’ या सिनेमात आमिर खानने साकारलेल्या रँचोच्या भूमिकेमुळे जगभरात लोकप्रिय झालेले प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवाणीयांना २०१८साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

भरत वाटवाणी यांनी भारतातील हजारो मनोरुग्ण मुलांना मानसिक आधार दिला आहे. या मुलांना त्यांनी नवं जीवदान दिल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये त्यांचे अनाथांसाठी  कार्य करणारी संस्था आहे.सोनम वांगचुक यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी लडाखमधल्या दुर्गम भागात भरीव योगदान दिलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत