वाई बाजार येथे ६३ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

माहुर( नांदेड): फिरोज पठाण

६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाई बाजारसह परिसरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून मान्यवरांच्या विश्लेशनात्मक प्रबोधनाने संपुर्ण वातावरण धम्ममय बनले होते. १४ ऑगस्ट १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या पावन पर्वावर नागपूरच्या दिक्षाभुमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह बौध्द धम्माची दिक्षा घेतली होती. तो अशोक विजयादशमीचा दिवस आंबेडकरी जनता मोठ्या हर्षोल्हासात साजरा करून डॉ.आंबेडकरांना अभिवादन करतात.

याच दिवसाचे औचित्य साधून मौजे वाई बाजार येथे आज दि.९ ऑक्टोबर रोजी महाभोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते थोर विचारवंत प्रा.डॉ.हमराज वुयके यांच्यासह वाई बाजारचे उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण यांनी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करून शेकडो महिला व अनुयायांच्या उपस्थितीत त्रिसरण व पंचशिलाचे ग्रहण करण्यात आले. तद्नंतर डॉ. वुयके व मान्यवरांच्या हस्ते गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शहीद बिरसामुंडा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व महात्मा ज्योतीबा फुले चौकातील नामफलकांचे पुजन करण्यात आले. यावेळी नवीन बसस्थानकांवरील कार्यक्रमस्थळी विचारवंत प्रा.डॉ.हमराज वुयके यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे विश्लेषण आपल्या वक्तृत्वाची छाप सोडली.

यावेळी परिसरातील आंबेडकरी अनुयायांसह माहूर येथील टिपू सुलतान बॉजचे कार्यकर्ते व मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्राचे सुत्रसंचालन अनाथपिंडीक कंधारे यांनी तर प्रास्ताविक सुभाष खडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाई बाजार येथील परिवर्तनवादी विचारमंच व टिपू सुलतान बॉईज् च्या संयंसेवकांनी अथक परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत