वाघिणीला मारले, त्यात मुनगंटीवारांचा काय दोष? : गडकरी

नागपूर : रायगड माझा वृत्त

वाघीण नरभक्षक झाली होती. तिने सुमारे तेरा जणांचा बळी घेतला. त्यामुळेच तिला ठार मारावे लागले. मात्र, त्यावरून सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. वनमंत्र्यांनी हातात बंदूक घेऊन तिला मारले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हास्यास्पद असल्याचे सांगून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचा जोरदार बचाव केला.

“अवनी’ची पांढरकवडा परिसरात प्रचंड दहशत होती. तिने तेरा लोकांना फस्त केले. तेरा लोकांचा बळी घेतला तेव्हा कुणालाच कंठ फुटला नाही, त्यांना गरिबांचा कळवळा आला नाही. वाघिणीला मारण्याचे मी समर्थन करीत नाही; मात्र तिला असेच सोडून दिले असते तर आणखी अनेकांचा जीव घेतला असता. वनविभागाने तिला जिवंत पकडण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र ती हाती लागली नाही. वाघिणीला ठार मारण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार वनविभागाने केली. वाघीण मेल्याचे मलाही दुःख आहे. मात्र, त्यावरून ज्या पद्धतीने राजकारण सध्या केले जात आहे, ते जास्त दुर्दैवी आहे.

वनमंत्र्यांचा राजीनामा मागणे हास्यास्पद असल्याचेही गडकरी म्हणाले. भाजपच्या नेत्या तसेच केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता गडकरी यांनी, “मी जे सांगितले त्यातच सर्वकाही आल्या’चे सांगून अधिक बोलण्याचे टाळले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत