वाजपेयींच्या पराभवाला रायगड ठरला जबाबदार

अलिबाग : रायगड माझा वृत्त

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2003 साली अविश्वास ठरावाला सामोरे गेले होते. खरंतर त्यांनी आपल्या पंतप्रधान कार्यकाळात दोन अविश्वास ठरावांचा सामना केला. 2003 साली लोकसभेत अविश्वास ठरावावर भाषण करताना पंतप्रधान वाजपेयी यांनी अत्यंत भावनिक भाषण करत सरकारबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास असल्याचे विचार व्यक्त केले होते. अवघ्या एका मताने भाजपा सरकार ला अविश्वास ठरावाद्वारे पराभूत करण्यात रायगडचे त्यावेळचे खासदार रामशेठ ठाकूर यांची भूमिका देखील निर्णायक अशीच होती. 

 

अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळण्याचे खरे कारण जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दिन सोझ यांनी अचानक अविश्वास ठरावाला पाठिंबा देऊन रालोआ सरकारविरोधात मतदान केले. यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. सोझ सध्या काँग्रेसमध्ये आहेत.

त्याहून धक्कादायक घटना लोकसभेत त्यावेळेस घडली होती; ती म्हणजे गिरिधर गमांग यांनी लोकसभेत येऊन सरकारविरोधात मतदान करणे. गमांग ओडिशाचे मुख्यमंत्री होते, त्यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता, मात्र त्यांनी लोकसभेचे सदस्यत्व सोडले नव्हते. त्यांच्या एका मताचाही रालोआ सरकारला फटका बसला. आज हेच गमांग भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचे खासदार असलेल्या रामशेठ ठाकूर यांना  सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी विनंती करण्यात आली होती;  मात्र त्यांनी देखील भाजपा सरकारविरोधात मतदान केले, आज रामशेठ ठाकूर देखील भाजपामध्ये आहेत. वाजपेयींनी कायम तत्वाचे राजकारण केले. त्यामुळेच एक मतांनी झालेला त्यांचा पराभव देखील त्यांच्या तत्व निष्ठेसाठी कायम स्मरणात ठेवला जाईल.  

 

सर्वांचा समज असा आहे कि मी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केले. पण वस्तुस्थिती अशी आहे कि हा निर्णय पक्षाचा होता . शेतकरी कामगार पक्षाचा मी खासदार होतो .मी फक्त पक्षादेश पाळला .  पण या नंतर मी जेंव्हा जेंव्हा  वाजपेयीजींना भेटलो ,तेंव्हा त्यांनी असे कधीच जाणवू दिले नाही. 

 रामशेठ ठाकूर -माजी खासदार
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत