वाजपेयींनी तीन वेळा घेतली पंतप्रधानपदाची शपथ!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला मध्यप्रदेशमधील ग्वालियर येथील शिक्षक कुटुंबामध्ये झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली. यासह ते एक उत्तम कवी, प्रखर वक्ते होते. सुरुवातीला काही काळ त्यांनी पत्रकारिताही केली. 1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने त्यांचा राजकारणाशी संबंध आली. तेव्हा त्यांना अटकही झाली होती. याच दरम्यान श्यामा प्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. राजकीय कारकिर्द सुरू झाल्यानंतर 1957 ला बलारामपूरमधून ते पहिल्यांदा खासदार झाले.

तीन वेळा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
अटल बिहारी वाजपेयी यांनी दोन वेळा हिंदुस्थानचे पंतप्रधानपद भूषवले. 1996 च्या निवडणुकीत भाजप 162 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे 1996 ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळवणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी 13 दिवसात राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले.

1998 च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA – National Democratic Alliance), ची स्थापना केली. अखेर 1998 च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर हिंदुस्थान पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले.

यानंतर 1999 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि वाजपेयींनी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. वायपेयी 19 मार्च 1998 ते 19 मे 2004 पर्यंत पंतप्रधान होते.

इतर कार्यकाळ

  • जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (1968-1973)
  • जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (1955-1977)
  • जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (1977-1980)
  • भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (1980-1986)
  • भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (1980-84, 1986, 1993-96),
  • विरोधी पक्षाचे नेते (11 वी लोकसभा)
  • हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री ( 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979)
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत