वाढदिवसावर अनाठायी खर्च न करता जपली सामाजिक बांधिलकी

नेरळ : कांता हाबळे

नेरळ मधील विक्रांत आहिर यांनी वाढदिवसावर अनाठायी खर्च न करता दहिवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वृक्ष वाटप केले आहे. सकाळपासून जोरदार पाऊस असतानाही नेरळ पासून 5 किलोमीटर असलेल्या दहिवली शाळेत जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप करुन शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. या सामाजिक बांधिलकी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 
नेरळ टेपआळी येथील विक्रांत आहिर यांचा 7 जुलै रोजी वाढदिवस असल्याने ते दरवर्षी शाळेतील गोर-गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असतात. यावर्षीही विक्रांत आहिर व त्यांच्या पत्नी वैष्णवी आहिर यांनी दहिवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांना वह्या, वॉटर बॅग, व इतर साहित्य व खाऊ वाटप करून शाळेच्या आवारात वृक्षरोपण केले.
यावेळी शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी विक्रांत अहिर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले, याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गणेश ठाकूर, शिक्षिका योगिता पथारे, तसेच योगेश राणे, उमेश राणे, मनन टेंबे, ऋषिता भगत आदी उपस्थित होते, यावेळी विक्रांत आहिर यांनी वृक्षरोपणाचे महत्व पटवून देत दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संकल्प केला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत