वादळी पावसाचा नेरळ मध्ये महावितरणला झटका 

नेरळ : अजय गायकवाड

काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नेरळ परीसरातील  महावितरणला वादळाचा झटका बसलाचं शिवाय आपली पदरमोड करून घेतलेल्या घराचे छप्परच उडून गेल्याने काही घरमालक आता हतबल झाले आहेत. आंबेवाडी येथे राहणाऱ्या दोन वर्षीय मुलाच्या डोक्यात घरातील सिलिंग पडल्याने तो थोडक्यात बचावला आहे.
           हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजमुळे काल कर्जत तालुक्यात खऱ्या अर्थाने दुपार नंतर पावसाला  सुरवात झाली.काही क्षणार्धात वादळीवाऱ्याच्या आगमनाने झाडांवर प्रहार करत विद्युत महावितरणला  झटका बसला असून काहींचे या वादळी वाऱ्याने संसार उघड्यावर आले आहे.
         नेरळ परिसरातील काही भागात काल पासून लाईट नव्हती,तसेच मोहाची वाडी,वाल्मिकी नगर,नेरळ पोस्ट ऑफिस,भडवल -दामत ग्रामपंचायत हद्दीत तसेच नेरळ     पूर्व भागात झाडे वादळी वाऱ्याने मोडून रस्त्यावर तर विद्युत वाहक तारेवर पडलेली दिसून आली.
    नेरळ बाजार पेठेत असणाऱ्या वाहन पार्क येथील  वाहनावर झाड पडल्याने त्या वाहनाचे नुकसान झाले होते. या वादळीवाऱ्याने मनुष्याला तर झोडून काढले शिवाय झाडावर घरटे बांधून राहिलेल्या असंख्य पक्ष्याचे कुटुंबच उद्वस्थ करून टाकली होती.नेरळ आंबेवाडी येथील राहणाऱ्या एका दोन वर्ष्याच्या मुलाच्या डोक्यात घरातील सिलिंग पडून दुखापत झाल्याने त्याला जवळील दवाखान्यात काल रात्री उशिरा नेण्यात आले होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत