‘वायफाय डब्बा’ देणार २० रुपयांत १ जीबी डेटा

( रायगड माझा टेक टीम )
 
नवी दिल्ली – जवळपास वर्षभरापूर्वी रिलायन्स जिओने बाजारात दाखल होत स्पर्धक कंपन्यांना चांगलाच दणका दिला आहे. पण जिओपेक्षाही स्वस्त इंटरनेट देणाऱ्या एका कंपनीने आता बाजारात प्रवेश केला आहे. ग्राहकांना आकर्षित करणारी एक ऑफर ‘वाय-फाय डब्बा’ नावाच्या एका स्थानिक कंपनीने दिली आहे. तुम्हालाही नक्कीच ही ऑफर ऐकून आश्चर्य वाटेल.
२ रुपयांत १०० एमबी डेटा या कंपनीने उपलब्ध करुन दिला आहे. तर १ जीबी डेटा २० रूपयात मिळू शकणार आहे. हा केवळ २४ तासासाठी प्लॅन असणार आहे. सध्या ही सेवा बंगळुरुमध्ये उपलब्ध आहे. ही सुविधा सध्या एकाच शहरात सुरु असली तरीही इतर शहरातही येत्या काही दिवसांतच आपली ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
याचे रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना कंपनीचे डेटा प्रीपेड रिचार्ज कूपन घ्यावे लागेल. बंगळुरुतील छोट्या दुकानांवर हे कूपन सहज उपलब्ध होईल. पण इतर कंपन्यांचे धाबे नव्या कंपनीच्या ऑफरमुळे आणखी दणाणेल अशीही चर्चा आहे. पण ही सुविधा ग्राहकांसाठी मात्र अतिशय फायद्याची असेल्याने ते अतिशय कमी किंमतीत इंटरनेट वापरु शकतील. आर्थिक दुर्बल घटकातील लोक तसेच विद्यार्थी वर्गासाठी ही सुविधा फायद्याची ठरेल.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत