वायु दलाचे जवान अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका होणार; इम्रान खान यांची घोषणा

Image result for bharat pakistan
दोन्ही देशातील संबंध सुधारणार असतील तर आम्ही भारताच्या वैमानिकास सोडण्याचा विचार करणार, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यानंतर भारताने संतप्त प्रतिक्रीया दिली होती.  पाकिस्तानने वैमानिकास त्वरीत मुक्त करवावे. मात्र, या बदल्यात आपण असा कोणताही करार करणार नाही ज्यामुळे दहशतवाद विरोधी कामगीरी कमकूवत होईल, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली होती. यानंतर पुढच्या परिणामांची दक्षता घेत पाकिस्तनने हा निर्णय घेतला.

पाकिस्तान भारतीय वायुदलाच्या जवानाचा अमानवीय छळ करत आहे. असे करून पाकिस्तान जिनिव्हा कराराचे उल्लंघन करत आहे, असा आरोपही भारताच्या वतिने लावण्यात आला होता. अभिनंद यांना बिकट समयी धैर्य आणि बळ मिळावे यासाठी संपूर्ण देशभरात प्रार्थना केली जात आहे.

बुधवारी पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईला घाबरून पाकिस्तानच्या वायुदलाने पळ काढला होता. कारवाई दरम्यान भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान जमिनदोस्त केले होते. तर, भारतालाही आपला एक विमान गमवावा लागला. हा विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यामुळे विमानाचे चालक अभिनंदन वर्धमान यांना पकडण्यात पाकिस्तानला यश आले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत