वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे ‘पद्मश्री’ जिव्या म्हशे यांचं निधन

पालघर: रायगड माझा वृत्त

वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे ‘पद्मश्री’ जिव्या म्हशे यांचं आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झाले. डहाणू तालुक्यातील गंजाड गावच्या कलमीपाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी पवनी, विठ्ठल, सदाशिव आणि बाळू ही तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहोचवण्यात मशे यांचा मोलाचा वाटा होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.