वाराणसीमध्ये पुलाचा भाग कोसळला, 12 जणांचा मृत्यू, 50 जण अडकल्याची भीती

वाराणसी : रायगड माझा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये पुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.  केंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावपथक घटनास्थळी पोहचले आहे. जखमींना जवळील रुग्णलयात पोहचवण्याचे काम सुरु आहे.

केंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचे बांधकाम सुरु होते. त्याचवेळी अचानक पुवाचा पिलर कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोक घाबरले आणि जिवाच्या आकांताने इकडेतिकडे पळू लागले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. वाराणसीतील केंट रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत