वाराणसी-हुबळी एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्‍न

श्रीगोंदा : रायगड माझा ऑनलाईन

अहमदनगर-दौंड लोहमार्गावर श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर आज दि.१५ रोजी पहाटे दोनच्या सुमारास वाराणसी-हुबळी एक्सप्रेस थांबली होती. यावेणी ७ ते ८ दरोडेखोरांच्या टोळीने रेल्‍वेने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र टीसी आणि रेल्वे सुरक्षा जवानांच्या तत्परतेमुळे हा प्रयत्‍न फसला. रेल्वे जवानांनी रोखलेल्या बदुंका पाहून दरोडेखोरांनी हत्यारे टाकून पलायन केले.

रेल्वे पोलिसांनी दरोडेखोरांनी टाकून दिलेले चॉपर, एअर पिस्तुल, दोन मोबाईल जप्त केले आहेत. याबाबत रेल्वे पोलिसांनी सांगितले की, हे ७ ते ८ दरोडेखोर कोपरगाव रेल्वे स्टेशनवरुन वाराणशी हुबळी एक्स्प्रेसमध्ये स्लीपर कोचमध्ये बसले. ते सर्व जण एकमेकांशी मराठीतून बोलत होते.

वाराणशी हुबळी एक्स्प्रेस श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर काँसिंगसाठी थांबली असताना दरोडेखोरांनी एकमेकांना सांकेतिक भाषेत संकेत देत आरडाओरडा सुरू केली. तिकीट निरीक्षक गडदे आणि थोरात यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी तातडीने रेल्वेमधील सुरक्षा जवान दादा येडे, अमोल साळवे, जी. आर. काळे यांच्याशी संपर्क साधून त्‍याची कल्पना दिली. यावेळी जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. पोलिस बंदुका घेऊन येत असल्याचे पाहून दरोडेखोरांमध्ये चलबिल झाली. त्यांनी रेल्वेतून उड्या टाकून अंधारात पळ काढला. मात्र, या गडबडीत त्यांच्यातील एकाची बॅग खाली पडली. या बॅगेत चॉपर, चाकून, एअर पिस्तुल, दोन मोबाईल रेल्वे पोलिसांना आढळून आले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत