वारे येथील विद्युत सबस्टेशनचे काम अंतीम टप्प्यात; निःकृष्ठ दर्जाचे कामामुळे स्थानिकांचा मात्र विरोध

नेरळ : कांता हाबळे

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कर्जत मुरबाड महामार्गालगत महावितरण कंपनीच्या होऊ घातलेल्या 22के व्ही सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, परन्तु  सबस्टेशन  कार्यान्वित करण्यासाठी ठेकेदार कंपनी कडून विद्युत वाहिन्या जोडण्याचे व त्यांचा चाचण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सबस्टेशन कार्यरत होण्याची शक्यता आहे, परंतु हे काम निकृष्ट असल्याने ग्रामस्थांनी या कामाला विरोध केला आहे. या कामाकडे महावीतरणा चे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामामुळे परिसरातील विद्युत वितरण व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे ,वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा ची समस्या दूर होण्यास मदत होणार असून कमी जास्त दाबाने होणाऱ्या वीजपुरवठा ही नियंत्रणात येईल , या सबस्टेशनमुळे या परिसरातील विद्युत पुरवठायची समस्या दूर होणार असल्या तरी सबस्टेशन च्या भूमिगत केबल च्या कामाच्या दर्जा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे  ,भूमिगत केबल चे काम सुरक्षेतेचे निकष न पाळता उरकण्यात आल्या चे स्थानिकांचे म्हणणे असून येथील रहिवाश्यांना उच्च दाबाच्या विद्युत वाहक केबल मुळे धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती स्थानिक नागरिकांमध्ये पसरली आहे
त्यामुळे भूमिगत केबल व अन्य कामे ठेकेदार कंपनीने उत्तम दर्जाची तसेच स्थानिक लोकांच्या सुरक्षतेची दक्षता घेऊनच करावी नंतर सबस्टेशन कार्यान्वित करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या केबल टाकताना स्थानीक शेतकर्यांचेही प्रचंड नुकसान झाले असून त्याची महाविरणा कडून अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही.

कर्जत मुरबाड राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग होणार असून त्याची सर्वे सुद्धा झाली आहे. काही महिन्यात मार्गाचे काम सुरू होणार या मार्गाची रुंदी ही वाढणार आहे राष्ट्रीयमहा मार्गाचे नियोजन असताना ही  सबस्टेशन चे भूमिगत तथा ओवर हेड वाहिन्या मार्गा लगत टाकल्याने रुंदीकरणा मुळे त्या पुन्हा काढाव्या लागणार आहेत असे असताना प्रशासकीय विभागातीत समन्वयाच्या अभावे जनतेचा पैसा मात्र वाया जाणार आहे. हे वास्तव आहे. 

सबस्टेशन च्या कामाची पाहणी केली असून त्यामध्ये त्रुटी आढळतात. भूमिगत वहिनीचे कामात सुरक्षतेची निकष राखल्याने दिसून येत नाही त्यामुळे त्यासंबंधी पूर्णत्वाचा दाखला (क्लीअरन्स सर्टिफिकेट)महावितरण कडून देण्यात आला नाही.

– अविनाश वानखेडे (अभियंता (सिव्हिल)महावितरण कंपनी पनवेल )

वारे ग्रामपंचायत हद्दीतील भूमिगत केबल ची कामे निकृष्ट दर्जाची असून केवळ 1 फूट जमिनीत तर काही ठिकाणी जमिनीवर उघड्यावर टाकल्याने या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी लिकेज झाल्यास मोठा अपघात होउ शकतो त्यामुळे महा वितरण कंपनीने स्थानिकांच्या सुरक्षेचा विचार करूनच सबस्टेशन कार्यान्वीत करावा, – परशुराम म्हसे (उपाध्यक्ष भाजप किसान मोर्चा कर्जत)

स्थानिक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतून केबल टाकल्याने शेतकर्यांचेही नुकसान झाले आहे त्याची नुकसानभरपाई ही आजतागायत मिळाली नाही.– प्रल्हाद म्हसे  (ग्रामस्थ वारे)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत