वाशीच्या एमजीएम रुग्णालयाची सिस्टीम हॅक, बदल्यात हॅकरने मागितले…!

नवी मुंबई:रायगड माझा 

नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३ मधील एमजीएम न्यु बॉम्बे हॉस्पीटलची सिस्टीम हॅक करण्यात आली आहे. तर हॅकरने सिस्टीम पुर्ववत करण्यासाठी बिटकॉईनद्वारे पेमेन्टची मागणी केली आहे. अज्ञात इसमाविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशीतलं हे मोठं हॉस्पिटल आहे, आणि त्यात ऐवढा मोठा सायबर क्राईम झाल्याने खळबळ माजली आहे.

एमजीएम हॉस्पिटलमध्ये रामनाथ परमेश्वरम हे काम करत असताना अज्ञात व्यक्तीने १५ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सिस्टीम हॅक केली. सिस्टीम पुर्ववत करण्यासाठी हॅकर ने बिटकॉईनद्वारे पेमेन्ट करण्यची मागणी केली. याविरोधात रामनाथ परमेश्वरम यांनी म्हॅकरने ई-मेल किंवा वायरसमधून सिस्टम हॅक केली आहे. या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला असून अधिक तपास गुन्हे शाखा सायबर सेलचे पोलीस उपआयुक्त तुषार दोशी करत आहे.

दरम्यान, ई-मेलमधून किंवा वायरसमधून सिस्टम हॅक झाली असल्याची शक्यता असल्याचं उपआयुक्त तुषार दोशी यांनी सांगितलं. त्यामुळे हा सायबर क्राईम नेमका कसा झाला आणि कोणत्या मोठ्या टोळीचा समावेश आहे का, याचा आता पोलीस तपास करत आहेत. पण दरम्यान या सगळ्या रुग्णांवर परिणाम होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत