वाहतुकी कोंडी सोडविण्यासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

पिंपरी : रायगड माझा वृत्त 

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी एका शिष्टमंडळास दिले आहे.

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत नगरसेवक मयुर कलाटे यांनी शिष्टमंडळासह शरद पवार यांची भेट घेतली. हिंजवडीत होणा-या वाहतूक कोंडीची सद्यस्थिती सांगितली. तसेच दीर्घकालीन तोडगा काढण्याबाबत निवेदन दिले. त्यावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी, पदाधिका-यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

शिष्टमंडळात हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत जाधव होते. हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हिंजवडीत प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. यामुळे वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. आयटीयन्सना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मयूर कलाटे म्हणाले,  की हिंजवडी आयटी पार्कची स्थापन पवार साहेबांनी केली आहे. त्यांच्यामुळे हिंजवडी गावाचे नाव जगाच्या नकाशावर उमटले आहे. त्यांना हिंजवडीतील वाहतूक कोंडीची सद्यस्थिती सविस्तर सांगितली. त्यानंतर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलिस, दोन्ही पालिकेचे आयुक्त, आयटी पार्कचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत पुढील आठवड्यात संयुक्ती बैठक घेण्यात येईल, असे पवार साहेबांनी सांगितले.

तसेच यामध्ये शरद पवार संयुक्त बैठक घेणार आहेत. आयटीपार्क येथे होणा-या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन प्रभावी तोडगा काढण्यासाठी या बैठकीत उपाय काढण्यात येईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.