वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसाचा चिरडून मृत्यू

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त 

वाहतूक कोंडी सोडवत असताना गाडीखाली चिरडून वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पनवेल मुंब्रा हायवेवर घडली आहे.  यात वाहतूक पोलिसाच्या अंगावरुन गाडी गेल्याने शरीर छिन्नविछिन्न झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  तळोजा एमआयडीसीतील आयजीपीएल कंपनी आणि एस एस कंपनीच्या दरम्यान  वाहतूक कोंडीत झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून मिळाली. त्यानंतर तळोजा वाहतूक शाखेतून रात्री तीन वाजण्याच्या पोलिस कर्मचारी अतुल घागरी तेथे पोहचले. वाहतूक कोंडी सोडवत असतानाच त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली आणि गाडीचे चाक अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यापूर्वी वाहतूक कोंडी सोडवत असताना याच भागात भरधाव वाहनांच्या धडकेने पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच रात्रीच्या वेळी फक्त एकच वाहतूक पोलीस कर्मचारी चौकीत असल्याचे समजते. यामुळे पोलीस खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

अतुल घागरे २०१२ मध्ये नवी मुंबई पोलीस दलात भरती झाले होते.  घागरे यांची पत्नी ही रबाळे पोलीस ठाण्यात पोलीस आहे. तसेच आज त्यांच्या मुलीचा वाढदिवसही होता. त्यांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत