वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या यादीत मुख्यमंत्र्यांसह परिवहनमंत्रीही!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या यादीत केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव नसून, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचेही नाव आहे. दस्तुरखुद्द परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीच याची माहिती दिली आहे. मात्र, रावतेंनी आपलं नाव कसं आलं असाव, याचं स्पष्टीकरणही सोबत दिले आहे.

ई-चलनच्या थकबाकी यादीत मुख्यमंत्रीच नाहीत, तर माझंही नाव आलंय. मात्र साध्य मी वाहन चालवत नाही. माझ्या घरचं वाहन चालवत असताना नियमांचं उल्लंघन झालं असेल, असे दिवाकर रावते म्हणाले.

“वसुली का होत नाही, याची आजच्या रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कारणमीमांसा झाली. वाहन चालकांनी वाहन घेताना स्वतःच्या मोबाईल नंबरऐवजी एजंटचा नंबर दिला, तर सर्व नोटीस त्या एजंटला जातात. मी निर्देश दिलेत की, आता यापुढे वाहन घेताना एजंटचा नंबर नाही, तर मालकाचा नंबर घेणे अनिवार्य असेल. परंतु आता आमच्याकडे ज्यांचे पत्ते आहेत, त्यांना पोस्टाने नोटिसेस पाठवणार आहोत”, अशी माहिती दिवाकर रावतेंनी दिली.

तसेच, मुख्यमंत्री असोत किंवा परिवहन मंत्री, कायदा सर्वांना सारखा आहे, असे सांगायलाही दिवाकर रावते विसरले नाहीत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.