विखे पाटलांना धक्का; मराठवाड्याला पाणी सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for vikhe patil

मराठवाड्याला पाणी सोडू नये यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून नाशिक, अहमदनगरमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

मराठवाड्याला नाशिक, अहमदनगरमधून पाणी सोडण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला स्थगिती देण्याची याचिका दाखल केली होती. ही याचिका आज मुंबई हायकोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत निळवंडे आणि इतर धरणांमधून ८ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे.

या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्चल्यायालयाने ‘पाणी ही कोणाचीही खासगी मालमत्ता नसल्याने कोणीही त्यावर दावा करू शकत नाही’ असे स्पष्ट केले होते. ‘पाण्यावर केवळ राज्य सरकारचा अधिकार असल्याने पाणी वाटपाचा निर्णयही सरकार घेऊ शकतं’ तर पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास, राज्यात अथवा एखाद्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास, धार्मिक किंवा इतर तत्सम कारणांसाठी पाणी सोडता येणार नाही’ असेही उच्चल्यायालयाने स्पष्ट केले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत