विजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय सर्वत्र वाहतूक ठप्प

भांडुप : किशोर गावडे

मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाल्याचे वृत्त हाती आले आहे. दरम्यान, आज मुसळधार पावसामुळे  चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आज भांडुप मधील भांडुप व्हिलेज रोड, भट्टीपाडा,कोकण नगर, महाराष्ट्र नगर, गावदेवी, तुळशेत पाडा  आदी सखल भागात आज पाणी साचले गेल्यामुळे  या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवार रात्रीपासून मुंबईत २८६.४ मिमी पावसाची नोंद  झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये  मुंबईमध्ये रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचं चित्र पाहायला मिळाले.या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुट्टी जाहीर केली असून मंगळवार सायंकाळपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत, तर रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

पाणी साचल्यामुळे बेस्टचे काही मार्गही बदलण्यात आल्याचे कळते. मुंबईत पुढच्या २४ तासात जोरदार पावसाचा तडाखा असेल असा  इशारा वेधशाळेने वर्तविला आहे . त्यामुळे महापालिका आयुक्तांनी खबरदारी घेण्यासंदर्भात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सावधगिरीच्या सूचना दिलेल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत