विजेच्‍या धक्‍याने डिकसळ येथे बैल तर उमरोली येथे गाईचा मुत्‍यू

महावितरणाचा हलगर्जीपणा जनावरांच्‍या जीवावर ; नुकसान भरपाईची मागणी

नेरळ – कांता हाबळे

महाविरणाचा हलगर्जीपणा पुन्‍हा एकदा जनावरांच्‍या जीवावर बेतला असून वारे ग्रामपंचायती हहद्दीतील मानकिवली येथे विजेच्‍या धक्‍याने एका बैलाचा तर डिकसळ येथे एका गाईचा मुत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. महाविरणाचा गलथान कारभार याला कारणीभूत असून सर्वत्र महाविरणाच्‍या विरोधात संताप व्‍यक्‍त केला जात आहे. तसेच मूत्‍यू पावलेल्‍या जनावरांच्‍या मालकांनी नुसकसान भरपाईची मागणी केली आहे.
शुक्रवारी रात्री मानकीवली गावातील एका विजेचा खांबाला शॉक लागत होता. तेथून गावातील हरीचंद्र राणे यांचा बैल जात असताना त्यांच्या बैलाला शॉक लागल्याने बैल जागीच ठार झाला. तर शनिवारी डिकसळ येथी येथील डायमंड रेसीडेनसी येथे विजेच्या डीपी भोवती पाणी साचले होते. तेव्हा येथील एक गाय आणि महिला जात होती तेव्हा गाईला शॉक लागला आणि गाईचा जागीच ठार झाली तर सुदैवाने महिला बचावली आहे. महावितरण अजून किती जनावरांचे जीव घेणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वेळोवेळी महावीतनाच्या निदर्शनास आणूनही ढिम्म महावीरणाचे अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.
कर्जत तालुक्‍यात अनेक ठिकाणी वेजेचे पोल तर विज वाहिण्‍या धोकादायक अवस्‍थेत आहेत. असे असताना यावर महावितरणा कडून कोणतीही उपाययोजना करण्‍यात येत नाही. त्‍यामुळे अशा घटना तालुक्‍यात दोन दिवसांनी घडत आहे. आठवडयाभरापूर्वी शेलू येथील एका शेतक-याच्‍या चार बोकडांना शॉक लागून त्‍यांचा मुत्‍यू झाला होता. तर वर्षभरात अनेक ठिकाणी शॉक लागून जनावरे दगावल्‍याची घटना घडल्‍या आहेत. असे असनाना महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी यापासून कोणाताही बोध घेत नसल्‍याचे यावरून दिसून येत आहे.
झोपेचे सोंग घेतलेल्या महावीतरनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना कोण जागे करणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे. तर याबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधी ही मूग गिळून गप्प असल्याने यावर कोणीही आवाज उठवला पुढे सरसावत नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर तालुक्यातील नेत्यांचीही उदासीनता यावरून दिसून येत आहे. 
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत