विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख

रायगड माझा वृत्त 

मुंबई :  राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत द्यावी या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील य़ांनी आज पाच लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.

            केरळमध्ये गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठा महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने विविध पातळ्यांवर मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. राज्यातील जनताही आपल्या परीने मदत करीत आहेत. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी प्रतिसाद देऊन आज पाच लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत