विदर्भाचा सौराष्ट्रावर दणदणीत विजय, सलग दुसऱ्यांदा रणजी चषक पटकावला

नागपूर : रायगड माझा वृत्त 

विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकला

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात विदर्भाचा विजय झाला आहे. या विजयामुळे विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकण्याची कामगिरी केली आहे. हा सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर सुरु होता. विदर्भाचा ७८ धावांनी विजय झाला आहे.

विदर्भाने सौराष्ट्राला विजयासाठी  २०६ धावांचे आव्हान दिले होते. विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या सौराष्ट्राला केवळ १२७ धावाच करता आल्या.  विदर्भाच्या या विजयात फिरकीपटू आदित्य सरवटने महत्वाची भूमिका निभावली. त्याने सौराष्ट्राच्या पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ६ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत