विदर्भात जादा जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी आग्रही

नागपूर : रायगड माझा वृत्त 

दोन्ही कॉंग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विदर्भात राष्ट्रवादीला जादा जागा मिळाव्या याकरिता आम्ही आग्रही राहणार आहोत. असे असले तरी संख्येसाठी वाद उद्भवू नये याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी जागावाटपाची चर्चा बंदद्वार व्हावी, याचे प्रयत्न राष्ट्रवादीतर्फे केल्या जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

File photo
आगामी निवडणुकीत कॉंग्रेससह सर्व समविचारी पक्ष व घटकांना आघाडीत सामावून घेण्यात येणार आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आघाडीसंदर्भात दोनवेळा चर्चा झाली. मात्र, जागावाटपांचा फॉम्युला अद्याप ठरलेला नाही. 2009 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 62 पैकी विदर्भात 14 जागा देण्यात आल्या होत्या. त्यात आणखी वाढ मिळावी, असे प्रयत्न आमचे राहणार आहेत. सांगलीतील पराभवाने आम्ही बरेच काही शिकलो. बंडखोरांचा मोठा फटका आम्हाला बसला. आता विधानसभेत आघाडी करताना उभय पक्षांच्या नेत्यांसोबत बंडखोरीच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. यावेळी त्यांनी सांगलीतील पराभव हा तांत्रिक असल्याचा दावा केला. यावेळी माजी मंत्रिद्वय अनिल देशमुख, रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.
भाजपचे फुसे राष्ट्रवादीत
भाजपच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष धनराज फुसे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आघाडीचा राजीनामा दिला होता.
…तर पेट्रोल शंभर रुपयांवर
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाने देशाची अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. राज्यात विदेशी गुंतवणूक येणे बंद झाले आहे. शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी सर्वच त्रस्त आहेत. पेट्रोलची मूळ किंमत 37 रुपये असताना नागरिकांना विविध करापोटी 88 रुपये मोजावे लागत आहे. पंतप्रधानपदी मोदी कायम राहिले, तर नजीकच्या भविष्यात पेट्रोल शंभर रुपयांवर जाण्यास वेळ लागणार नाही, असे पाटील

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.