विदर्भ, मराठवाड्यात १९ आॅक्टाेबरपासून आंदाेलन – राजू शेट्टी

बुलडाणा : रायगड माझा वृत्त 

दुष्काळामुळे शेतकरी हाेरपळून गेला असून, शासनाचे डाेके ठिकाणावर आणण्यासाठी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे १९ आॅक्टाेबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यात आंदाेलन करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी अाज येथे पार पडलेल्या साेयाबीन-कापूस परिषदेत दिला.

Raju-Shetty

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साेयाबीन-कापूस परिषदेचे आयाेजन बुलडाण्यात करण्यात आले हाेते. विदर्भातील साेयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांना वाचा फाेडण्यासाठी आयाेजित या परिषदेला खासदार राजू शेट्टी, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर आदी उपस्थित होते. परिषदेत बाेलताना शेट्टी यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘महात्मा गांधींना नावे ठेवणारे आज सत्तेत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळ्याच्या आगीत हाेरपळत आहे. पण शासनाला पाझर फुटत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १९ आॅक्टाेबरपासून तीव्र आंदाेलन करण्यात येईल.़़ दुष्काळाची झळ पाेचलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत