विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना अटक

नागपूर:रायगड माझा 

वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर येथे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनआजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सरकारविरोधात आणि विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भवाद्यांनी नागपूर बंदची हाक दिली. मात्र, बंदच्या आव्हाला तुरळक प्रतिसाद मिळाला. सकाळी ११नंतर विदर्भवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. व्हरायटी चौकात वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन करणाऱ्या सुमारे ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी ‘विदर्भविरोधी आमदारांनो परत जा’च्या घोषणा देण्यात आल्या. सरकार आमचं आंदोलन हुकुमशाही करुन दडपत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत